Tuesday, July 20, 2010

गेले ते दिवस......


गेले ते दिवस......


पुन्हा बघायचा आहे तो C-23 आणि C-13 चा जल्लोष..
पुन्हा बघायचा आहे तो तुमचा Vollyball चा गेम..
आणि तो खेळतांना कोणाचा बसतो त्या Flat मधील तीन पोरीवरती नेम...
त्याच एका जोशाने....आणि शेवट वडापावने..........

पण वाटते.....आता आहेत फक्त आठवणी.....
कारण गेले ते दिवस..गेले ते दिवस...गेले ते दिवस ....


पुन्हा करायची आहे तयारी TREK साठी....
सोबत विसरलेल्या रोप आणि नकाशाची....
आशिषच्या "पाण्याच्या बाटल्या घेतल्या का?" ह्या प्रश्नाशी.....
आणि सुट्टीसाठी बॉसशी केलेल्या त्या लुटुपुटू लढाईशी....

पण वाटते.....आता आहेत फक्त आठवणी.....
कारण गेले ते दिवस..गेले ते दिवस...गेले ते दिवस ....


पुन्हा जायचे आहे गडाच्या दिशेने....
शोधत गडाच्या शिखराचा थाट......
पहायची आहे आशिषच्या Group ची चुकलेली वाट.....
आणि आमच्या Group शी सुटलेली साथ .....

पण वाटते.....आता आहेत फक्त आठवणी.....
कारण गेले ते दिवस..गेले ते दिवस...गेले ते दिवस ....


पुन्हा खायची आहे राहुलची तर्रीवाली भाजी....
सोबत तुमच्याबरोबर......
आणि संतोषच्या आणि सागरच्या गप्पांबरोबर.......
ह्याच गोंधळात चालू असणारया त्या TV बरोबर....

पण वाटते.....आता आहेत फक्त आठवणी.....
कारण गेले ते दिवस..गेले ते दिवस...गेले ते दिवस ....


पुन्हा बघायची आहे....राहुलनी केलेली धसगिरी....
आणि गडावरती आपण केलेली राहुलबाबांची गगनगिरी....(ग = झ*नगिरी)
बघायची आहे विशालसोबत राज ठाकरेंची भाषणगिरी......
आणि शोधत पुन्हा का झाली विशालची Interview ला हाराकिरी

पण वाटते.....आता आहेत फक्त आठवणी.....
कारण गेले ते दिवस..गेले ते दिवस...गेले ते दिवस ....


कविता केली फक्त ह्याच्यासाठी....
कारण गेले आहेत अनिल,संतोष आणि विशाल गोदाकाठी.....
राहुलपण आता होईल त्याच्या बायकोसाठी.......
होईल का परत आपल्या अश्याच भेटीगाठी???

आणि म्हणेन का मी कधी......आले ते दिवस... आले ते दिवस... आले ते दिवस......  





                                                                                                             --जय घोलप

मित्रानो,आपला पुढच्या सहलीसाठी पर्याय निवडा....